रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!

पुन्हा सुरू झाली लाकडाची अवैध कत्तल

Tv-1india 

रोहा :प्रतिनिधी


  वनविभाग खात्याच्या अजब कारभारामुळे सामान्य शेतकरी हैराण झाले आहेत.वनविभागाचे कर्मचारी लाकूड व्यापा-यांना हाताशी धरुन अवैध वृधतोड करत आहेत. त्यामुळे वनविभाग जाणीवपूर्वक या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून आता रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड पुन्हा सुरू झाली आहे.   वृक्षतोड होत असणा-या सानेगाव परिसरातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सरकार आणि नोकरशाही त्याच्या निष्क्रीय आणि ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेला रोज नव्या समस्याना सामोरे जावे लागत आहे.समस्या सोडवून घेण्यासाठी म्हणून शासन दरबारी जायचे आणि दरबारातून परतायचे असा अनुभव नागरिकाना आला आहे.  सानेगाव जंगलपट्टयात  मोठया प्रमाणात   वृक्षतोड सुरू आहे. ऐन ,किंजळ,साग ,आणि इतर जातीची झाडे आहेत. या झाडांचा विट भट्टीसाठी  लाकडाचा वापर  केला जातो. त्यासाठी मोठी मागणी असते, परिणामी लाकडाला  मोठी किमत मिळते. तसेच  या कामी व्यापारी आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यात साटेलोटे निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.

  त्यामुळे सानेगाव परिसरामध्ये २५/२चा मनाई आदेश असताना अवैधपणे तोड सुरू आहे. वनपाल व वनरक्षक तसेच तालुका वनक्षेत्रपाळ लाकूड व्यापा-याजवळ बेकायदेशीर संगनमत करून वृक्षाची तोड करत आहेत.याची मुख्यवन संरक्षक याच्या कडुन चौकशी करून यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी परिसरात जोर धरत आहे.

  सानेगाव वनबिटामध्ये राजरोज बेकादेशीर खैराची तोड  २०२२मध्ये झाली होती. अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला होता आता देखील केला जात आहे.   वनरक्षक बनलेत भक्षक  ?

असा सवाल सानेगाव परिसरातून होत आहे.  या प्रकरणात कर्मचारी याची चौकशी केली जाईल का? असा प्रश्वन नागरिकाकडुन उपस्थित केला जात आहे,

   रोहा तालुक्यात नव्याने रूजू झालेले वनअधिकारी मनोज वाघमारे यांना सदर जागी पद कसे मिळाले? रोहा रेंज कशी मिळाली ? वन कायद्याने त्यांचा दोन झोन आहे.त्यांना रोहा रेंज मिळाली पाहिजे. अशाने स्थानिक चोरांना बेकायदेशीर मदत होऊ शकते.सरकारी जंगलाची चोरी वाढु शकते.

    हा असाच प्रकार २०२२मध्ये घडला आहे.

 शेतकरी नरेश कदम सानेगाव याच्या जागेत खैराची फक्त १७ झाडे आहेत. त्याच्या सातबारावर ३०० झाडे दाखवली आहेत. नरेश कदम वर त्यामुळे वन खात्याची फसवणूक केली म्हणून अ-४२०चा गुन्हा दाखल करण्यात यावा. पण असे अजूनही झालेले नाही.

  कारण,या प्रकारामध्ये वन अधिकारी यात गुतलेले आहेत. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी "निसर्ग साथी " संस्थे कडून  केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???