नेपाळी मालकाने विजयला केले ठार
साई एकविरा चायनीज सेंटरवर झालेल्या मारामारीत नेपाळी मालकाने विजयला केले ठार
Tv-1india
पेण दिपक लोके
मयत:-विजय पवार
वडखळ पोलीस ठाणे हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्यांत वाढ होत आहे.आज सर्वत्र होळीच्या सणाची धामधूम सुरु असताना येथील साई एकविरा चायनिज सेंटरवर नेपाळी मालका सोबत झालेल्या मारामारीत, चायनिज वरील काम करणाऱ्या विजय हरीचंद्र पवार वय २४ वर्ष राहणार वावे (नवेगाव) आदिवासी वाडी वडखळ याला जिवेठार मारण्याची संतापजनक घटना घडली. यातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी विजयाची पत्नी तसेच कुटुंब व ग्रामसथांकडून करण्यात येत आहे
या घटनेचा तपास डी वाय एस पी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक तानाजी नारनवार हे करत आहेत
या घटने नंतर मृत विजय च्या नातेवाईक व आदिवासी समज बांधवांनी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
आरोपीला अटक करण्यात येऊन, गुन्ह्याची नोंद करण्यात येत असल्याची माहिती डी वाय एस पी संजय शुक्ला व पोलीस निरिक्षक तानाजी नारनवार यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment