अभ्युदय बँक जेएनपीटी तर्फे महिलांचा सत्कार
अभ्युदय बँक जेएनपीटी तर्फे महिलांचा सत्कार
Tv-1india
प्रतिनिधी :समीर बामुगडे
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. या महिला दिनाच्या औचित साधता अभ्युदय बँक च्या वतीने सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व महिलांना पुष्प गुच्छ व मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी अभ्युदय बँकेचे व्यवस्थापक आर.एस.पारते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिला समाजात कुठेच कमी नाहीत. महिला आपल्या हिमतीवर जग जिंकू शकतात. आज महिलांनी समाजात वेगळ स्थान निर्माण केले आहे. आज त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात परिपूर्ण आहेत. एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकत मात्र एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शिकतो. त्यामुळे महिलांना समाजात एक विशेष स्थान देणे गरजेचे आहे. त्यामुळे स्त्रियांचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. तसेच या वेळी त्यांनी सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी राजश्री पाटील, विनीता म्हात्रे, सुप्रिया म्हात्रे, प्रेमलता ठाकूर, प्रियांका नाईक, रतन ठाकूर, प्रियंका म्हात्रे, सुमती ठाकूर, आश्रया शिवकर, सुभांगी ठाकूर, तेजश्री पाटील, रुपाली पाटील, नूतन थळी इतर महिला, बँकेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment