रमेश धनावडे यांचे 'कवितेच्या सुरातून' हे पुस्तक संदर्भग्रंथ ठरेल -कवी ए.के. शेख
रमेश धनावडे यांचे 'कवितेच्या सुरातून' हे पुस्तक संदर्भग्रंथ ठरेल -कवी ए.के. शेख
Tv-1india
अलिबाग
एका कवीबद्दल दुसरा कवी चांगले बोलत नाही. मात्र कवी रमेश धनावडे यांनी कवितेच्या सुरातून या पुस्तकाद्वारे ६३ कवींची त्यांच्या काव्याच्या रसास्वादासह माहिती देऊन मौलिक कार्य केले आहे, त्यांचे हे पुस्तक संदर्भग्रंथ ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, गझलकार ए.के. शेख यांनी केले.
रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणेचे उपमहाव्यवस्थापक - एच.आर.(कॉर्पोरेट अफेअर्स), साहित्यिक, कवी रमेश प्रभाकर धनावडे यांच्या 'कवितेच्या सुरातून' या पुस्तकाचे प्रकाशन आदर्श पतसंस्था सभागृह येथे कवी, गझलकार ए.के. शेख, माजी आमदार पंडित पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, विशेष सरकारी वकील अँड. प्रदीप घरत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, कामगार नेते दीपक रानवडे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरुड-जंजिरा शाखाध्यक्ष संजय गुंजाळ, रायगड जिल्हा सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा ग्रंथालयाचे संचालक नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मंगेश तावडे, प्रभाकर धनावडे, पूनम रमेश धनावडे, साहित्यिक उमाजी केळुसकर आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी कवी, गझलकार ए.के. शेख होते. ते पुढे म्हणाले, रमेश धनावडे यांच्या कवितेच्या सुरातून या पुस्तकातील लेखसंग्रहातून संत ज्ञानेश्वरांपासून आजच्या कवींपर्यंतचा हा काव्यप्रवास अतिशय मनोज्ञ असा झाला आहे. प्रत्येक कवीला न्याय द्यायच्या प्रयत्नात त्यांनी घेतलेल परिश्रम, कष्ट डोळ्यात भरतात. या पुस्तकाचे रसिक चांगले स्वागत करतील असेही त्यांनी शेवटी म्हटले.
प्रारंभी माजी आमदार पंडीत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत रमेश धनावडे यांची लेखन यात्रा अशीच अखंडित राहो अशा शुभेच्छा दिल्या. सुधीर शेठ, दीपक रानवडे, अँड. प्रदीप घरत, डाॅ. राजू पाटोदकर, साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी आपल्या भाषणांतून रमेश धनावडे यांच्या पुस्तकास आणि त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रारंभी कवी रमेश धनावडे यांनी आपल्या मनोगतात या पुस्तकामागची भूमिका मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात तेजल रमेश धनावडे यांच्या नृत्याने झाली. याप्रसंगी नवीन कार्यालयाचा शुभारंभ होत असल्याबद्दल आर्किटेक्ट अपूर्वा धनावडे हिचा, कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल श्रृती देसाई-राजे यांचा, कवितेच्या सुरातून या पुस्तकाचे प्रकाशक साहित्य संपदा प्रकाशनाचे वैभव धनावडे यांचा, तसेच या पुस्तकातील प्रकरणे वाचल्याबद्दल अभिनेत्री श्रद्धा पोखरणकर, सामाजिक कार्यकर्ती जीविता पाटील यांचा, तसेच मुद्रीत शोध केल्याबद्दल महेश कवळे व सामाजिक कार्यकर्ती तपस्वी गोंधळी यांचा सन्मान करण्यात आला.
साहित्य संपदा प्रकाशनाचे वैभव धनवाडे यांनी रमेश धनावडे यांना यावेळी पुस्तक रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला. या प्रकाशन समारंभासाठी मोठ्या प्रमाणात रसिकांची उपस्थिती होती...!
Comments
Post a Comment