राजमाता जिजाऊ मतिमंद शाळेचे स्नेहसंमेलन

विशेष मुलांच्या शाळेत नृत्यकलेचा आविष्कार

राजमाता जिजाऊ तिमंद शाळेचे स्नेहसंमेलन

Tv-1india 

अलिबाग,प्रतिनिधी

 जन्म घेणार्‍या प्रत्येकाला निरोगी आयुष्य लाभावे, अस वाटत असते. उंच आकाशात भरारी घ्यावी, फुलपाखरा सारखे बागडावे. पण अनेकांच्या नशिबात है सौख्य नसते. त्यामुळे विविध आजारामुळे जन्मापासून अपंगत्व आलेल्या विशेष अपत्यांना सांभाळताना पालकांची विशेष करून जन्मदात्रीला तारेवरची कसरत करावी लागते. अशा विशेष मुलांसाठी अलिबाग येथील कुरुळ आरसीएफ कॉलनीत पाठबळ सामाजिक संस्थेच्यावतीने गेल्या दहा वर्ष पासून मतिमंद शाळा चालविली जात आहे. या विशेष शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यामध्ये शाळेतील मुलांनी आकर्षक चित्रे रेखाटून,विविध मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेत तसेच बहारदार नृत्ये सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.


या कार्यक्रम प्रसंगी आरसीएफचे कार्यकारी संचालक ए. एम. खाडिलकर, भालचंद्र देशपांडे, संतोष वझे आवर्जून उपस्थित होते. यावेळी खाडिलकर यांनी आपल्या भाषणातून शाळेचे,शिक्षकांचे तसेच पालकांचे विशेष कौतुक केले.अशा विशेष मुलांना सांभाळणे सोपे काम नाही. अशा विशेष मुलांना जीवापाड सांभाळणारे पालक,आई या जिजाऊ सारख्या आहेत. मनावर दगड ठेवून मुलांचे संगोपण करणे अवघड असेच काम आहे. अशा शाळा चालविणे हा पण एक चांगला उपक्रम असून, सर्वांचा मोठा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या विशेष शाळेला आरसीएफमार्फत मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यापुढेही मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले.


प्रास्ताविक करताना विनायक देशपांडे यांनी हा मोठा सोहळा असून विशेष मुलांच्या जीवनातील आनंदाचा दिवस असल्याचे नमूद केले.शाळेच्या दशकपूर्ती निमित्त तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, खुल्या मैदानातील स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. या मुलांनी सुंदर चित्रे काढून आपली कला दाखवून दिली. या मुलांबरोबरच अन्य शाळा मधील विद्यार्थी पण स्पर्धेत सहभागी झाले होते.विशेष मुलांची वेदना समजावी, ही भूमिका होते, असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत मदत करण्याचे आवाहन केले.शाळेसाठी मदत करणारे शिक्षक वर्ग यांचेही देशपांडे यांनी कौतुक केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी समूह नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. नटराज नृत्य अकादमी, कला तरंग क्या उमेश कोळी आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी मुलांचे नृत्य उत्तमरित्या बसवून सादरीकरण केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नलावडे, मुलांना सांभाळणार्‍या शाळेतील मावशी श्रध्दा घरत यांचेही पालकांनी कौतूक केले. आभार प्रदर्शन प्रियांका पाटील यांनी केले.या सांस्कृतिक कार्यक्रमात मोरया मोरया या गाण्यावर रेाहीत, ओमकार, सुयश, सानिका, पुजा, त्रुचा, मृण्मयी, सीमा, नमिता, पूर्वा यांनी बहारदार समूह नृत्य सादर केले.तर हम काले है या गाण्यावर रोहीत धुमाळने केलेल्या एकेरी नाचाला प्रेक्षकांनी दाद दिली.

 नमिता, सानिका, पुजा, ऋचा, पूर्व, सीमा यांनीही अग राधे हळूहळू चालना या गवळणीवर सुंदर नृत्य सादर केले.फीर भी दील है हिदुस्तानी-कपिल, स्वयंम, सारा, अनुष, अथव, मानव, मानस, अदिती, आयात, अनुजा या नटराज डान्स अ‍ॅकॅदमी,कलातरंगच्या कलाकारांनी उत्तम नृत्य सादर करीत प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!