रमेश धनावडे यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
रमेश धनावडे यांच्या 'कवितेच्या सुरातून' या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
Tv-1india
रायगड
रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणेचे डेप्युटी जनरल मॅनेजर - एच.आर.(कॉर्पोरेट अफेअर्स), साहित्यिक, कवी, रायगड भूषण रमेश प्रभाकर धनावडे यांच्या 'कवितेच्या सुरातून' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, ५ मार्च रोजी, आदर्श पतसंस्था सभागृह, आदर्श भवन, जगे उद्यानासमोर येथे करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या या पुस्तक प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार, कवी ए.के. शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. रमेश धनावडे यांचे हे चौथे पुस्तक आहे. यापूर्वी त्यांची मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन केले आहे. तसेच दिवाळी अंकांमधून कथा, लेख, कविता लेखन केले आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा 'रायगड भूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कवितेच्या सुरातून या पुस्तकांमधून त्यांनी संत काव्य ते आजपर्यंतच्या सुप्रसिद्ध कवींची यशोगाथा प्रभावीपणे मांडली आहे या पुस्तकांमध्ये बासष्ट पेक्षा जास्त कवींना एकत्र आणून एक ऐतिहासिक दस्तावेज तयार केला आहे. हा एक संदर्भ ग्रंथ असल्याने हे पुस्तक रेफरन्स बुक म्हणून येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यांच्या 'कवितेच्या सुरातून' या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशक साहित्य संपदा समूह असून या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन धनावडे कुटुंबाने केले आहे.
Comments
Post a Comment