शेजारधर्म करणाऱ्या इसमाचा खून झाल्याची घटना

बाळसई गावांत चाकू हल्यात एका व्यक्ती चा खून शेजारधर्म आला अंगाशी झाला असंगाशी संग रोहा समीर बामुगडे महिलेला होणारी नवऱ्याची सातत्याने मारहाण पाहून शेजारधर्म करणाऱ्या इसमाचा खून झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर घटना अशी कि,गावांत राहण्यारा परशुराम पवार ही व्यक्ती गेली कित्येक महिने व विनाकारण त्यांच्या शेजारी राहत असलेल्या दत्ताराम राऊत यांना विनाकारण त्रास देत होता.तो दारू पिवून घरी येऊन त्याच्या पत्नीला विनाकारण त्रास देऊन शिवीगाळ करत असे. असंच होळी च्या दिवशी सुद्धा ती व्यक्ती नेहमीचे प्रकार करत दत्ताराम राऊत यांना शिवीगाळ करत आली.त्यांनी घरामध्ये वापरात असेलेली सूरी आणली व दत्ताराम राऊत यांचावर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्यांचं फुफुस व आतडे यावर मोठी गंभीर इजा झाली, त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालय मध्ये हलवले, नंतर पेन येथे उपचारासाठी पाठवले. त्यांची प्रकृती बिघडली व त्यांचं मृत्यू झाला. सदर गुन्हाची नोंद नागोठणा पोलीस स्टेशन येथे झाली असून आरोपीवर 302 307 310 गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.