शिवसेनेच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत मोठे निर्णय
शिवसेनेच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत मोठे निर्णय
एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य नेते, सिद्धेश कदम सचिवपदी
Tv-1india
मुंबई
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवाड्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या पहिल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शिंदे याचे शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. ही माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले.
सिद्धेश कदम शिवसेनेचे सचिव
शिवसेनेच्या आजच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेचे कोकणातील नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिस्तभंग समितीची स्थापना
आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे असतील. ही त्रिसदस्यीय समिती असेल.
शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय खालील प्रमाणे
१. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.
२. राज्यातील भूमिपुत्रांना सर्व प्रकल्पांमधील नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देणे.
३. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे.
४. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना 'भारतरत्न' देणे.
५. UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे.
Comments
Post a Comment