उद्धवराव मळभ दाटले त्यात आभाळ फाटले.
उद्धवराव मळभ दाटले
त्यात आभाळ फाटले.
हृषीकेश जोशी.
महाराष्ट्र प्रदेश सचिव
भारतीय जनता युवा मोर्चा.
एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे देशभर अशा प्रकारचे ताकद असलेले लोक यांचा बंदोबस्त करायला तिकडचे पक्ष प्रामुख्याने सुरवात करतील. काँग्रेस यात आघाडीवर असेल. काँग्रेसमध्ये देखील पूर्वी गांधी घराण्याला चॅलेंज करण्याचे प्रकार झाले. शरद पवार त्यातले प्रमुख नेते आहेत. पण पवारांना गांधी हटवता आले नाहीत. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने पवार तिथे कमी पडले. एकनाथ शिंदे हे आव्हान पेलू शकले कारण त्यांना भाजपचे सहकार्य होते असा आरोप आहे. उद्धव यांचा कायदेशीर पराभव एकनाथ शिंदेंनी आज तरी केलेला आहे.
धनुष्यबाण निशाणी व शिवसेना या पक्षाचं नाव मिळाल्यावर किती सर्वसामान्य लोक शिवसेनेसोबत राहतात व किती लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात हे पाहणं आता औत्सुक्याचे आहे.
मी मागे एका लेखात लिहल होत. उद्धव ठाकरे यांनी पक्षनेतृत्व कार्यकारी प्रमुख म्हणून हातात घेतल्यावर बाळासाहेबांच्या कडवट विचारांची व संघर्ष शील असणारी शिवसेना ही भगवी काँग्रेस करून टाकली. मुलाला यूवा सेना काढून देऊन ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे अशाच व्यक्तींना युवा सेनेचे पद दिले. सर्वसामान्य लोकांच्या संघर्षाला बढावा देण्यापेक्षा कॉर्पोरेट व्यक्तींना, इव्हेंट मॅनेजरना तिथे महत्व आले. साधारण 2000 सालानंतर संघर्ष करणारे शिवसैनिक कमी झाले. अनेक लोक काँग्रेस राष्ट्रवादी मधून येऊन स्थिरावले.
2005 ला मनसेचा उदय झाला आणि सेनेसमोरचे आव्हान वाढले ते आव्हान 2014 ला मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळेपर्यंत सुरू होते. 2014 ला मनसेचा परफॉर्मन्स डाऊन झाला. शिवसेना परत 63 आमदार घेऊन उभी राहिली आणि 2019 ला ती 56 लोकापर्यंत आली.
उद्धव ठाकरेंनी स्वतःच ज्या पद्धतीने कॉर्पोरेट व पैस्याचे महत्व असणाऱ्या लोकांना महत्व देऊन आधुनिक संघटना उभी केली ती संघटना आता संघर्ष करण्याच्या मनस्थितीत आहे का? व उद्या फसवणूक करून भाजपला सत्तेसाठी गंडवल तर आज ज्या पद्धतीने वाताहत झाली आहे त्यासोबत संघर्ष करायला आपली शारीरिक मानसिक तयारी आहे का? याचा वीचार केलेला दिसून येत नाही.
उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडल्यावर हिंदुत्ववादी पारंपरिक राजकारणाचा त्याग करून आपले पाठीराखे आपल्यासोबत राहतात का हा प्रयोग केला. त्यात त्यांना गुलामी मानसिकतेच्या कार्यकर्त्यांचा चांगला रिस्पॉन्स आला पण आमदार दुखावले कारण त्यांचे भवितव्य अंधारात चालले होते.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक लाभाचे निर्णय राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत राहून घेतले यात त्यांच्यावर कायदेशीर अडचण येऊ शकते याचा त्यांनी विचार केला नाही व सामान्य शिवसैनिकाचा काय फायदा होतोय? याचा विचार केला नाही. अगदी या काळात घरी बसून कारभार केला व मुख्यमंत्री मदत निधी देखील दुर्लक्षित ठेवला.
उद्धव ठाकरेंनी आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत अगदी संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊन एक विशिष्ट समुदाय, वारकरी, श्री सदस्य , समर्थ भक्त दुखावतील याचा विचार केला नाही व त्यांचे पाऊल चुकते आहे हे सांगायला त्यांचे कॅडरही धजावले नाही. जेव्हा त्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले त्यावेळी सुषमा अंधारे याना राज्यभर फिरवून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची व्होट बँक जवळ करण्याचा प्रयत्न केला व आपले कॅडर आपल्या मागे कुत्र्यासारखे फरफटत येइल हेच पाहिले. आता त्यांनी व्हीबीएचा प्रयोग केला आहे. पण त्यांचे अर्धे कॅडर अजून त्यांच्याच सोबत आहे असा त्याचा दावा आहे. पण मतदार? तो काय मूर्ख असतो का?
उद्धव ठाकरे जेव्हा भाजप सोबत निवडणूक लढवून व नंतर भाजपला फसवून मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आणि राष्ट्रवादीने मिळून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन बनवले होते. देवेंद्र यांची पहाटेच्या शपथविधीला फसवणूक झालेली होती. त्यांच्याकडे आकडे नव्हते. अडीच वर्षात उद्धव यांनी ज्या पद्धतीने कारभार केला व आपले नेतृत्व व संघटना राष्ट्रवादी कडे गहाण टाकली त्यावेळी आपोआप आकडे त्यांच्याविरुद्ध गेले. त्यांना हिंदुत्ववादी भूमिकेला तिलांजली देण्याचा फटका बसला.
काही महिन्यांपूर्वी जो व्यक्ती मुख्यमंत्री होता तो आता कुठल्याही पक्षाचा प्रमुख न राहणे हा सर्वोच्च अपमान त्यांना स्वतःच्या हव्यासापोटी पाहायला लागला आहे आणि आता सत्तेची घाणेरडी सवय झालेल्या त्यांच्या कॅडरला तो सहन करणें भाग आहे. त्यांची व त्यांच्या उर्वरित कार्यकर्त्यांची मीडियामधून व गावाखात्यात टवाळी सुरू आहे. त्यावर बापट सारखे घटनातज्ञ मीठ टाकून मजा घेत आहेत.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या केस मध्ये मेरिट नाही म्हणूनच निवडणूक आयोगाने त्यांचा पक्ष त्यांच्या हातातून काढून घेतला. आता सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या केसचा निकाल देखील उद्या शिंदे गटाच्या बाजूने आला तर त्यांना फक्त न्यायव्यवस्थेला नाव ठेवण्याचा व व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा पर्याय उरतो पण ते जेवढे ही कृत्य करत जातील तेवढं त्यांच नुकसान होईल. कारण कोर्ट जस केसच मेरिट पाहत असत तस समोरच्याच वर्तन देखील पाहत.
येणारा काळ संघर्षाचा असणार आहे हे ठीक आहे तो संघर्ष उद्धव यांची अंधफॉलो करणारी संघटना करेल पण आता उर्वरित प्रकरणं बाकी आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पक्ष संघटना आहेत. यांचे कडे गावठी भाषेत गवणा किती मिळतो?यावर त्यांच लष्कर चालत. आता त्यांच्या नादाला लागून उद्धव ठाकरे यांनी कोणकोणते बेकायदेशीर निर्णय घेतले हे शासनाने काढले नाही म्हणजे मिळवले.
आमचा धर्म बाळासाहेब ठाकरे व आमचा पक्ष उद्धव ठाकरे अशी टॅगलाईन देऊन सध्या त्यांच्या पाठिराख्याना हवा देण्याचं काम मातोश्री करत आहे. म्हणजे सकल हिन्दूना यांनी वाऱ्यावर सोडले आहे. व आम्ही करू ती पूर्वदिशा आमचा नेता खरा आहे व सगळ्या न्यायव्यवस्था व इतर लोक खोटे आहे हे कायद्याच्या कक्षेत उद्धव ठाकरे यांना किती टिकवता येणार आहे?
अस मानुया जर एकनाथ शिंदे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असते तर उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या संघटनेच्या लोकांवर त्यांनी विक्रमी गुन्हे नोंदवून ऐकेकाला तडीपाऱ्या लावल्या असत्या. याबाबत भाजपचे लोक मात्र दयाळू आहेत. ते काँग्रेसच्या लोकांनी त्यांना त्रास दिलेला असताना त्यांच्यावर सूड घेत नाहीत कारण ते त्यांच्या शिकवणीत नाही. हाच तो उध्दवजीना बुडत्याला काडीचा आधार म्हणावा तसा आधार आहे.
आकाशात ज्यावेळी मळभ येते त्यावेळी दम्याच्या पेशंटची जी अवस्था होते ती उद्धव यांची झाली आहे व त्यांना 5 किमीची रेस धावायची आहे. या सर्वाला 100% तेच जबाबदार आहेत हे सांगायला घटनातज्ञ बापट यांची गरज नाही.
Comments
Post a Comment