नांदगाव खारिकवाडा आयोजित चौरंगी कबड्डी स्पर्धा अलिबाग कोपरच्या खुशबू संघाने जिंकली.

 नांदगाव खारिकवाडा आयोजित चौरंगी कबड्डी स्पर्धा

अलिबाग कोपरच्या खुशबू संघाने जिंकली.

Tv-1india

मुरुड-जंजिरा 

 मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मंडळ खारिकवाडा आयोजित जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे महाशिवरात्री निमित्त चौरंगी कबड्डी स्पर्धा अलिबाग कोपरच्या खुशबू आईस्क्रीम संघाने जिंकली व प्रथम क्रमांकाचे तीस हजार एक रोख रक्कम व चषक पटकावला !

         खुशबू संघाने अंतिम फेरीत सुदेश घुमकर स्पोर्ट्स नांदगाव संघाचा निसटता पराभव केला.या संघाला दुसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम वीस हजार एक व चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील तिसरा क्रमांक मजगावच्या स्वतंत्र स्पोर्ट्स क्लबने मिळवला तर ताडवागळे संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.त्या दोघांनाही प्रत्येकी दहा हजार एक रोख रक्कम व चषक देण्यात आले. प्रो-कबड्डीतील बंगाल वॉरियर्स संघाचा खेळाडू केदार लाल, रायगड जिल्हा कबड्डी संघाचा प्रतिक जाधव ,प्रतिक धुमाळ,प्रशांत तावडे, अफ्फान किरकीरे ,भरत पाटील आदी खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत प्रेक्षकांची मने जिंकली.


         स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू खुशबूचा रघु पाटील ठरला.उत्कृष्ट चढाईपटू प्रतिक धुमाळ तर उत्कृष्ट पकड व बोनसपटू ही दोन्ही बक्षिसे केदार लाल याने पटकावली.स्पर्धेचे उद्घाटन सदाशिव तळेकर यांच्या अध्यक्षतेखालील समारंभात करण्यात आले.तर बक्षिसांचे वितरण उसरोली ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तांबोळी यांच्या हस्ते आगरी समाज अध्यक्ष अरविंद शेडगे, शंकर बुवा राऊत, शरद कुमरोटकर , नितेश भणगे, गोरख कुमरोटकर,पंकज तळेकर,प्रमोद भेर्ले,केतन मांदाडकर, आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सामन्यांचे समालोचन सागर राऊत यांनी केले.

        स्पर्धा पाहण्यासाठी मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन,रोहा , उरण,पेण आदी भागातील शेकडो प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.मंडळाच्या सदस्यांसह खारिकवाडा ग्रामस्थांनी स्पर्धेची चोख व्यवस्था केली होती.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!