जितेंद्र दिवेकर राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात

रोह्याचे माजी उप-नगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात

Tv-1india

रोहा टीम

रोहा नगरपालिका राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष  जितेंद्र दिवेकर यांनी आज कॅबिनेट मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते,आमदार जिल्हाध्यक्ष प्रशांत दादा ठाकुर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

 जितेंद्र दिवेकर युवा असल्या पासून खा. सुनील तटकरे यांच्या जवळचे म्हणून सर्वपरिचित होते. नगरसेवक, सभापती ते उप-नगराध्यक्ष म्हणूनत्यांची नावाजलेली कारकीर्द आहे.त्यामुळे त्यांचा प्रवेश तटकरेना मोठा धक्का मानला जातो. आम्ही रक्ताचे पाणी करून वर्षानुवर्षे पक्षकार्य केले. पण आता तटकरे यांचा हम करें सो कायदा सर्वांनाच त्रासदायक होतो आहे.म्हणून माझ्या असंख्य मित्रांसह आम्ही हा निर्णय घेतला आहे. लवकरच मोठ्या प्रमाणात अनेकजण भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे दिवेकर यांनी tv-1india सोबत बोलतांना स्पष्ट केले.

आज प्रवेश करते वेळी भाजप रोहा तालुका अध्यक्ष सोपानजी जांभेकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, कामगार नेते जितेंद्र घरत,सोशल मीडिया संयोजक अमर वारंगे उपस्थित होते.

रोहा शहरात राष्ट्रवादी कॉग्रेसला धक्का !

  रोहा शहरात प्रचंड ताकद म्हणून दिवेकर माहिती आहेत.रोहा शहरात लहान मुला पासुन ते थोरल्यानं  "जितेंद्र बंधु दिवेकर"ओळख आहे.त्यांच्या रूपाने भाजप नक्कीच भरारी घेण्याचे संकेत दिसून येत आहेत. उप-नगराध्यक्ष असताना गोर गरीबाच्या हाके जाऊन प्रत्यक्ष मदत करणारा नेता म्हणून त्यांचा मोठा प्रभाव आहे.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!