माथेरानमध्ये मिरा रोड मधील रिक्षाचा बेकायदेशीर मुक्त संचार,
माथेरानमध्ये मिरा रोड मधील रिक्षाचा बेकायदेशीर मुक्त संचार, गुन्हा दाखल
Tv-1india
माथेरान
माथेरानमध्ये कोणत्याही वाहनास प्रवेश नाही. सध्या 'ई रिक्षा' प्रायोगिक तत्वावर चालविली जात आहे. शासनाच्या वतीने सात रिक्षा चालवल्या जात असून माथेरानमध्ये केवळ पर्यावरण पूरक ई रिक्षा यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र माथेरानमध्ये वाहनांना बंदी असताना देखील मिरा रोड मुंबई येथील प्रवाशी रिक्षा 12 फेब्रुवारी रोजी मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले.दरम्यान, सदर रिक्षा ग्रामस्थांनी अडविली असून पोलिस ठाण्यात थांबविण्यात आली आहे.आता रिक्षा न्यायालयात हजर केली जाणार आहे.
माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे, मात्र पर्यावरण पूरक ई रिक्षा माथेरान नगरपरिषद कडून चालविली जात आहे. या ई रिक्षा शासनाच्या परवानगीने प्रायोगिक तत्वावर चालवल्या जात आहे. मात्र बाहेरील रिक्षा यांना माथेरानमध्ये येऊ शकतात,असे वाटल्याने मिरा रोड मुंबई येथील एक प्रवासी रिक्षा 12 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता शहरात पोहचली. त्यावेळी स्थानिकांनी एम एच 02 डीयु 2889 ही गाडी चालक प्रमोद कुमार होरीलाल यादव 43 हा प्रवासी यांना घेवून आला. त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आणि सदर रिक्षा पोलीस ठाण्यात नेली. अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी पोलिसात त्या रिक्षाबद्दल तक्रार दिली. रिक्षा चालविण्यास बंदी असताना प्रवासी वाहन आणण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्यात त्या रिक्षा चालक वर गुन्हा दाखल केला आहे. तर ती रिक्षा देखील ताब्यात ठेवण्यात आली आहे.
माथेरान पोलीस ठाण्यात या खासगी प्रवासी रिक्षा बद्दल गुन्हा दाखल केला असून त्या रिक्षा एम एच 02 डी यु 2889वर आणि चालक यादव यांच्यावर माथेरानमध्ये वाहनांना बंदी असताना वाहन नेल्याबद्दल माथेरान अधिनियम 1959 चे कलम 43 तसेच मोटार वाहन 66ए ॲक्ट 2000 आणि मुंबई पोलीस अधिनियम 17/199 अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे. याबाबत त्या रिक्षास न्यायालयात हजर केले जाणार असून यापूर्वी देखील काही वाहने स्थानिक नियमांची माहिती नसल्याने शहरात प्रवेश केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती माथेरान पोलीस ठाणे यांच्याकडून देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment