Posts

Showing posts from February, 2023
ऐनघर ग्रामपंचायतच्या अपहाराबाबत  ‌...आम्हाला न्याय मिळेपर्यंत हा लढा अखेरच्या श्वासापर्यंत लढू दिनेश कातकरी.           रोहा( समीर बामुगडे) रोहा तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर मध्ये २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये घडलेल्या अपहाराचे बाबतीत अंतिम निकाल सन्माननीय. ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांनी देऊन सुद्धा गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करण्यास व पुढील कार्रवाई करण्यास विलंब करीत असल्याकारणाने तसेच पुढील कार्रवाईस होणारे विलंबाचे कारण लक्षात येत नसल्याकारणाने आणि आज प्रत्यक्षात काम करीत असणारे सदस्य यांच्यावर त्वरित ३९(१) ची कार्रवाई व्हावी याकरिता ऐनघर पंचक्रोशी हद्दीतील ग्रामस्थ आणि ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे कार्यकर्ते यांनी मंगळवार दि.२२/२/२०२३ रोजी पंचायत समिती रोहा यांचे कार्यालयाचे आवारात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण पुकारला होता. सदरच्या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या आदेशाचे पालन करून तसेच प्रस्तुत प्रकरणी जबाबदारी निश्चित झाल्यानंतर सन्माननीय ग

शिवसेनेच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत मोठे निर्णय

Image
शिवसेनेच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीत मोठे निर्णय एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य नेते, सिद्धेश कदम सचिवपदी Tv-1india  मुंबई  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवाड्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या पहिल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शिंदे याचे शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. ही माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. सिद्धेश कदम शिवसेनेचे सचिव शिवसेनेच्या आजच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेचे कोकणातील नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिस्तभंग समितीची स्थापना आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे असतील. ही त्रिसद

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम

Image
संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे आरोप शिंदे गटाचा निशाणा Tv-1india मुंबई   शिवसेनेतील कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊतांनी केलेल्या आरोपावरून आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊतांनी हा आरोप केल्याची टीका म्हस्के यांनी केली आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे, ते तपास करतील. केवळ श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी संजय राऊत यांनी खोटे आरोप केले आहेत. राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांच्यावर इलाज होणं गरजेचं आहे. असंबंध बोलणे हाच त्यांचा उद्देश आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी सध्या त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका म्हस्के यां

उद्धवराव मळभ दाटले त्यात आभाळ फाटले.

Image
उद्धवराव मळभ दाटले त्यात आभाळ फाटले. हृषीकेश जोशी.   महाराष्ट्र प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा. एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे देशभर अशा प्रकारचे ताकद असलेले लोक यांचा बंदोबस्त करायला तिकडचे पक्ष प्रामुख्याने सुरवात करतील. काँग्रेस यात आघाडीवर असेल. काँग्रेसमध्ये देखील पूर्वी गांधी घराण्याला चॅलेंज करण्याचे प्रकार झाले. शरद पवार त्यातले प्रमुख नेते आहेत. पण पवारांना गांधी हटवता आले नाहीत. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने पवार तिथे कमी पडले. एकनाथ शिंदे हे आव्हान पेलू शकले कारण त्यांना भाजपचे सहकार्य होते असा आरोप आहे. उद्धव यांचा कायदेशीर पराभव एकनाथ शिंदेंनी आज तरी केलेला आहे.  धनुष्यबाण निशाणी व शिवसेना या पक्षाचं नाव मिळाल्यावर किती सर्वसामान्य लोक शिवसेनेसोबत राहतात व किती लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात हे पाहणं आता औत्सुक्याचे आहे.  मी मागे एका लेखात लिहल होत. उद्धव ठाकरे यांनी पक्षनेतृत्व कार्यकारी प्रमुख म्हणून हातात घेतल्यावर बाळासाहेबांच्या कडवट विचारांची व संघर्ष शील असणारी शिवसेना ही भगवी काँग्रेस करून टाकली. मुलाला यूवा सेना काढून देऊन ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे

आता खरी शिवसेना भाजपबरोबर, अमित शहा गरजले

Image
  आता खरी शिवसेना भाजपबरोबर, सं पूर्ण विजय द्या.. कोल्हापूरच्या सभेत अमित शहा गरजले.. Tv-1india कोल्हापूर  निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नावाने मते मागितली. सत्ता मिळाल्यानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले. पक्ष कोणता मोठा होता हे सर्वांनाच माहिती होते. मात्र,आता परिस्थिती बदलली आहे. खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपबरोबर आली आहे. आता आम्हाला बहुमत नको आहे तर संपूर्ण विजय पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व 48 जागा पंतप्रधान मोदींच्या झोळीत टाका, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. कोल्हापुरात आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. शहा यांनी उद्धव ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. ठाकरेंनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. ठाकरे म्हणाले, अमित शहांनी वचन दिले होते. युती तुम्ही तोडली मी नाही. आम्ही एकटे लढलो आणि जिंकलो सुद्धा. यावर शहा म्हणाले, की निवडणुकीत मोदींचे फोटो मोठे होते. बरोबर उद्धव ठाकरेंचे छोटे फोटो होते. निवडणुकीत मोदींच्या नावाने मते मागितली. पण सत्ता मिळाल्यावर मात

नांदगाव खारिकवाडा आयोजित चौरंगी कबड्डी स्पर्धा अलिबाग कोपरच्या खुशबू संघाने जिंकली.

Image
  नांदगाव खारिकवाडा आयोजित चौरंगी कबड्डी स्पर्धा अलिबाग कोपरच्या खुशबू संघाने जिंकली. Tv-1india मु रुड-जंजिरा     मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मंडळ खारिकवाडा आयोजित जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे महाशिवरात्री निमित्त चौरंगी कबड्डी स्पर्धा अलिबाग कोपरच्या खुशबू आईस्क्रीम संघाने जिंकली व प्रथम क्रमांकाचे तीस हजार एक रोख रक्कम व चषक पटकावला !          खुशबू संघाने अंतिम फेरीत सुदेश घुमकर स्पोर्ट्स नांदगाव संघाचा निसटता पराभव केला.या संघाला दुसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम वीस हजार एक व चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील तिसरा क्रमांक मजगावच्या स्वतंत्र स्पोर्ट्स क्लबने मिळवला तर ताडवागळे संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.त्या दोघांनाही प्रत्येकी दहा हजार एक रोख रक्कम व चषक देण्यात आले. प्रो-कबड्डीतील बंगाल वॉरियर्स संघाचा खेळाडू केदार लाल, रायगड जिल्हा कबड्डी संघाचा प्रतिक जाधव ,प्रतिक धुमाळ,प्रशांत तावडे, अफ्फान किरकीरे ,भरत पाटील आदी खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत प्रेक्षकांची मने जिंकली.          स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू खुशबूचा रघु पाटील ठरला.उत्कृष्ट च

जितेंद्र दिवेकर राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात

Image
रोह्याचे माजी उप-नगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात Tv-1india रोहा टीम रोहा नगरपालिका राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष  जितेंद्र दिवेकर यांनी आज कॅबिनेट मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते,आमदार जिल्हाध्यक्ष प्रशांत दादा ठाकुर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  जितेंद्र दिवेकर युवा असल्या पासून खा. सुनील तटकरे यांच्या जवळचे म्हणून सर्वपरिचित होते. नगरसेवक, सभापती ते उप-नगराध्यक्ष म्हणूनत्यांची नावाजलेली कारकीर्द आहे.त्यामुळे त्यांचा प्रवेश तटकरेना मोठा धक्का मानला जातो. आम्ही रक्ताचे पाणी करून वर्षानुवर्षे पक्षकार्य केले. पण आता तटकरे यांचा हम करें सो कायदा सर्वांनाच त्रासदायक होतो आहे.म्हणून माझ्या असंख्य मित्रांसह आम्ही हा निर्णय घेतला आहे. लवकरच मोठ्या प्रमाणात अनेकजण भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे दिवेकर यांनी tv-1india सोबत बोलतांना स्पष्ट केले. आज प्रवेश करते वेळी भाजप रोहा तालुका अध्यक्ष सोपानजी जांभेकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, कामगार नेते जितेंद्र घरत,सोशल मीडिया संयोजक अमर वारंगे उपस्थित होते. रोहा शहरात राष्

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

Image
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी Tv-1india मुंबई ब्युरो  महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.             तत्पूर्वी श्री. बैस यांचे शुक्रवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.     श्री.रमेश बैस यांचा परिचय             नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.             दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.             सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर

महाराष्ट्र राज्यात सत्ता संघर्ष

Image
महाराष्ट्रात सत्ता संघर्ष.... Tv-1india मराठी ब्युरो  सत्तासंघर्षावर दोन्ही पक्षाकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत असताना सरन्यायाधीशांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं विधान सरन्यायाधीशांनी केलं आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी वरील विधान केलं आहे.  घटनेच्या दहाव्या सुचीत बहुसंख्य-अल्पसंख्याक ही संकल्पना नाही. त्यामुळे तुम्ही बहुसंख्य असलात तरी तुम्ही अपात्र आहात. त्यामुळे आम्ही ३४ आहोत असे म्हणण्यात काही अर्थ नाही. या सगळ्यात एकमात्र मार्ग म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच आहे, असा युक्तिवाद कबिल सिब्बल यांनी केला. तसंच पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं. त्यानुसारच विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस दिली गेली होती, असाही दावा सिब्बल यांनी केला.  घटनेच्या १० व्या सूचीचा गैरवापर होऊ देऊ नका "घटनेच्या १० व्या सूचीचा आधार घेऊन

माथेरानमध्ये मिरा रोड मधील रिक्षाचा बेकायदेशीर मुक्त संचार,

Image
  माथेरानमध्ये मिरा रोड मधील रिक्षाचा बेकायदेशीर मुक्त संचार , गुन्हा दाखल Tv-1india माथेरान  माथेरानमध्ये कोणत्याही वाहनास प्रवेश नाही. सध्या 'ई रिक्षा' प्रायोगिक तत्वावर चालविली जात आहे. शासनाच्या वतीने सात रिक्षा चालवल्या जात असून माथेरानमध्ये केवळ पर्यावरण पूरक ई रिक्षा यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र माथेरानमध्ये वाहनांना बंदी असताना देखील मिरा रोड मुंबई येथील प्रवाशी रिक्षा 12 फेब्रुवारी रोजी मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, सदर रिक्षा ग्रामस्थांनी अडविली असून पोलिस ठाण्यात थांबविण्यात आली आहे.आता रिक्षा न्यायालयात हजर केली जाणार आहे. माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे, मात्र पर्यावरण पूरक ई रिक्षा माथेरान नगरपरिषद कडून चालविली जात आहे. या ई रिक्षा शासनाच्या परवानगीने प्रायोगिक तत्वावर चालवल्या जात आहे. मात्र बाहेरील रिक्षा यांना माथेरानमध्ये येऊ शकतात,असे वाटल्याने मिरा रोड मुंबई येथील एक प्रवासी रिक्षा 12 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता शहरात पोहचली. त्यावेळी स्थानिकांनी एम एच 02 डीयु 2889 ही गाडी चालक प्रमोद कुमार होरीलाल यादव 43 ह

व्हॅलेंटाईन कोण आहे?...हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे?

Image
व्हॅलेंटाईन कोण आहे?...हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे?…जाणून घ्या सौजन्य - गुगल 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा सर्वात मोठा दिवस, जो जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, हा दिवस इतरांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी, प्रेमळ जोडपे प्रेमळ संदेशांसह कार्ड, फुले किंवा चॉकलेट पाठवतात. आपल्यापैकी बहुतेकांना याची जाणीव असली पाहिजे, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन कधी सुरू झाले? 14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. असे मानले जाते की रोमचा राजा क्लॉडियसच्या काळात या दिवसाचा उत्सव सुरू झाला. त्या काळी रोममध्ये एक धर्मगुरू असायचा, त्याचे नाव सेंट व्हॅलेंटाईन होते. व्हॅलेंटाईन डेची सुरुवात त्यांनीच पहिल्यांदा केली. व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो असे मानले जाते की सेंट व्हॅलेंटाईन जगभर प्रेम वाढविण्याचा विचार करत असे, परंतु तो ज्या शहरामध्ये राहत होता त्या शहराचा राजा क्लॉडियस याला हे मान्य नव्हते. राजाचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह पुरुषांची बुद्धिमत्ता आणि शक्ती नष्ट करतात. म्हणूनच राजाने आदेश दिला होता की तेथील सैनिक आणि अधिकारी लग्न करणार ना

खारघर कॉलनी फोरमच्या पाचव्या जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन

Image
खारघर कॉलनी फोरमच्या पाचव्या  जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन माजी नगरसेविका लीना गरड यांच्या हस्ते (खारघर/Tv-1india)  खारघर कॉलनी फोरम सेक्टर 20 मधील हावरे स्प्लेंडर शॉप नंबर 22 मधील समाजसेवक  उद्योजक हेमंत सिंह यांच्या जनसंपर्क कार्यालयातून  फोरमच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सहकार्य ,संघर्ष, फोरम तर्फे  विविध उपक्रम राबविणार असल्याचे समन्वयक हेमंत सिंह यांनी सांगितले. यावेळी खारघर कॉलनी फोरम अध्यक्ष लीना अर्जुन गरड ,फोरम समन्वयक हेमंत सिंह ,अनिता भोसले, मधु पाटील ,बालेश भोजने ,राजेश श्रीवास्तव ,प्रमोद सिंह, संतोष सिंह व आदी मान्यवर पत्रकार वर्ग उपस्थित होते. खारघर फोरम राजकीय दृष्ट्या लोक नेतृत्व करण्यासाठी जनतेला पर्याय म्हणून नक्कीच आवडेल स्वाभिमान अभिमान बाळगून आपल्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संस्था म्हणून कॉलनी फोरम आपले कार्य करीत आहे. असे मत खारघर कॉलनी फोरम अध्यक्ष लिना गरड यांनी मांडले.

शत्रुंजय महातीर्थाबाबत रायगडमध्ये जैन समाज उतरणार रस्त्यावर

Image
शत्रुंजय महातीर्थाबाबत जैन समाज उतरणार रायगडमध्ये रस्त्यावर रविवार 11 फेब्रुवारी 2023 अलिबागला विराट विरोध प्रदर्शन TV-1india अ मूलकुमार जैन      गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालीताना हे शहर जगातील एकमेव शाकाहारी शहर आहे. जे कायदेशीरदृष्ट्या शाकाहारी शहर आहे. गेल्या काही वर्षांपासून या नगराचे पावित्र्य भंग होत असल्याचा आरोप होत आहे. एवढेच नाही तर जैन धर्मियांच्या श्रद्धेचे केंद्र शत्रुंजय पर्वतावर वसलेले पालिताना मंदिर आहे. तेथे अवैध उत्खनन तसेच बांधकाम,,अवैध व्यवसाय सुरू आहे.हे रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जैन समाजाची भव्य रॅली ही श्री विराट सागर महाराज यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. पा लीताना हे शहर मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पूर्वी पालीताणा येथे सुमारे 1000 छोटी-मोठी मंदिरे होती. जैन धर्माचे 23 प्रवर्तक पालिताना पोहोचल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शत्रुजय पर्वतावर असलेली मंदिरे श्रद्धेची केंद्रे आहेत. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पालिताना नावाचे एक गाव आहे. शेकडो वर्षांपासून हे शहर जैन धर्मीयांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या कारणास्तव पालीताना हे शहर जग

ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Image
  कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी - विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर Tv-1india News Buareo कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.    विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी दि. 30 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पालघर चे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपायुक्त मनोज रानडे आदी उपस्थित होते. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण 99 मत