अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी 

कर्तव्यात कसूर केल्याने उचलबांगडी


Tv-1india

रायगड ब्युरो 


मुरुड-जंजिरा मधील संभाव्य हत्याकांड प्रकरणी चुकीचे वर्तन करणाऱ्या इन्स्पेक्टरची अखेर उचलबांगडी करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेतील हा जघन्य प्रकार घडला आहे.

या प्रकरणात मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करीत त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल कक्ष येथे नेमणूक केली आहे.राहुल अतिग्रे यांची मुरूड पोलीस ठाण्यातून उचलबांगडी झाल्याने शिवसेना नेत्या सीमा धोत्रे-राऊत, तक्रारदार पुष्पा गांधी यांनी समाधान व्यक्त केले आहे.



   सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे हे मुरूड पोलीस ठाणे येथे प्रभारी असताना मुरूड शहरात मे 2022 मध्ये संपत्तीच्या हव्यासापोटी पत्नीने मुस्लिम समाजातील प्रियकराच्या मदतीने औषध देऊन हत्या केली आहे.असा संशय मयत पप्पु जैन यांच्या भगिनी पुष्पा गांधी यांना आल्याने त्यांनी न्यायासाठी खुप प्रयत्न केले. त्यांची कोणतीही सुनवाई मुरूड पोलीस ठाणे येथे होत नव्हती. शेवटी कित्येक महिन्यांनी मुरुडच्या माहेरवाशीण मुंबईच्या शिवसेना पदाधिकारी सीमा धोत्रे-राऊत यांनी यामध्ये मुख्य भूमिका बजावली. पुष्पा गांधी खुप निवेदन देत न्याय मिळावा अशी मागणी केली होती.मात्र मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतीग्रे यांनी सदर निवेदनाकडे कानाडोळा करीत निवेदनात संशयित म्हणून नमूद केलेल्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचे अर्थपूर्ण प्रयत्न करीत असल्याचा संशय मुरूड तालुक्यासहित जिल्ह्यात व्यक्त होत होता.याबाबत मयत व्यक्ती याची बहीण पुष्पा गांधी यांनी या संदर्भात यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटनांचे कोकण विभाग अध्यक्ष अमूलकुमार भलगट तसेच शिवसेनेच्या सीमा राऊत यांच्या मदतीने जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या भेटी घेत सदर कैफियत मांडली.



   अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे संशयित आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते.याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ताबडतोब सदरचा गुन्हा हा गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांच्याकडे वर्ग केला. ज्यादिवशी हा गुन्हा वर्ग झाला त्यादिवशी सुद्धा मुरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे सायंकाळी चार ते साडे पाच वाजेपर्यंत मुरूड बाजारपेठ येथील एका उपहारगृह येथे बसले होते. आणि आरोपीना पळून जाण्यास मदत केली असल्याचा आरोप मयत याची बहीण यांनी केला आहे. आणि पाचच्या सुमारास मयताची पत्नी आणि मुलगा हे जेव्हा निघून गेल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी जाऊन चौकशी करत असल्याचा बहाणा केला.मात्र सदर गुन्हा हा गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असताना मुरूड पोलीस कर्मचारी का चौकशी करीत होते ?असाही सवाल उपस्थित होत आहे.


शिवसेना नेत्या :-सीमा धोत्रे-राऊत


  त्याचप्रमाणे मुरूड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे यांच्या सांगण्यावरून आरोपींना मदत करीत तक्रारदार यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत होते.

  राहुल अतिग्रे हे मुरूड पोलीस ठाणे येथे हजर होण्यापूर्वी ते पोयनाड पोलीस ठाण्यात असताना सुद्धा त्यांच्या कारकीर्दीवर स्थानिकांनी संशयास्पद होती.त्यांची बदली होण्यापूर्वी त्यांनी पोयनाड मधील काही व्यापारी यांच्याकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बाजारपेठ येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वर्गणी गोळा केली. मात्र आजपर्यंत सदर कॅमेरे  कुठे बसवले आहेत?याची माहिती अजूनही नाही.

  तसेच राहुल अतिग्रे हे मुरूड पोलीस ठाणे येथे येथे कार्यरत असताना मुरूड पोलीस ठाण्याच्या परिसरात  प्रभारी यांच्यासाठी निवासस्थान असताना सुद्धा ते मुरूड पासून साधारणपणे पस्तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जेएसडब्लू येथील वसाहत मधून ये जा करीत असताना ते त्यांची खासगी वाहन न वापरता शासकीय वाहनाचा उपयोग करीत होते.शासकीय वाहनाचा वापर करीत असताना त्यांच्या इंधनाचा खर्च हा कुठून केला जात होता? तसेच आजपर्यंत मुरूड पोलीस ठाण्यात अनेक प्रभारी येऊन गेले,मात्र त्यांनी कधी त्यांचे कार्यालयात वातानुकूलित आणि प्रशस्त असावे असे वाटले नाही. मात्र अतिग्रे यांनी येताच मुरूड पोलीस ठाण्यात  अधिकारीपूर्वी बसत होते ते कार्यालय सोडून कारकूनच्या आणि पोलीस उप निरीक्षक यांची बसण्याची जागा होती ते ताब्यात घेऊन ते वातानुकूलित केले.त्यासाठी जवळपास दीड ते दोन लाख रुपये खर्च केले.  ते कोणाच्या परवानगीने? आणि त्याचा खर्च कुठून केला? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीने केली आहे.

Comments

Popular posts from this blog

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!