कोकणात छोट्या वाइनरी मायक्रो वायनरी परवानगी मिळाव्यात

 कोकणात छोट्या वाइनरी मायक्रो वायनरी परवानगी मिळाव्यात व प्रत्यक्ष प्रकल्प उभे राहावेत यासाठी समन्वय.

उत्पादन शुल्क खात्याचा सकारात्मक प्रतिसाद 

कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून अभियान !

Tv-1india

Raigad 

 महाराष्ट्र राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी मंत्रालयातील बोलावलेल्या मिटिंगच्या पार्श्वभूमीवर कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव व कोलथरचे उद्योजक माधव महाजन यांनी माननीय अप्पर आयुक्त एक्सईज यतीन सावन्त यांची त्यांच्या कार्यालयात जुने जकात घर मुंबई येथे भेट घेतली.

 सदर झालेल्या चर्चे मध्ये आलेल्या सर्व मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली . त्या वेळी यतीन सावन्त यांनी छोट्या वायनरी होण्यासाठी सम्पूर्ण सहकार्य करू असे सांगितले . शिवाय फ्रुट वाईनचा प्रसार व्हावा यासाठीही प्रयत्न करू, तुम्ही सेमिनारचे आयोजन करा , असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांना सुचवले .

  गेली ५/६ वर्षे  माधव महाजन  यासाठी प्रयत्न करीत होते . माजी आमदार माननीय विजय सावन्त , भाई मोकल ,  विनयजी नातू , माधव भंडारी , कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष  पाशाजी पटेल , नितीन गडकरी,  आमदार प्रसाद लाड , संजय यादवराव, आम.योगेश कदम , आ शेखर निकम शा अनेकांच्या गाठीभेटी / पत्रव्यवहार केला . या सर्वांनी वेळोवेळी चांगले सहकार्य दिले . त्यामुळे राज्यातील छोट्या फळ बागायदार , उद्योजक यांना नवी संधी उपलब्ध होणार आहे .

 शिवाय वाईन उदयोगाची सांगड  पर्यटन उद्योगाशी घालण्याचा मानसही  यतीन सावन्त यांनी बोलून दाखवला . आसाम , कुर्ग , फ्रान्स शा ठिकाणी गावोगाव वेगवेगळ्या फळांच्या वाईन करून पर्यटकांना दिल्या जातात. वायनरी दाखवली जाते तशी रचना कोकणात करण्याचा प्रयत्न करू असे या वेळी संजय यादवराव म्हणाले .

कोकण बिझनेस फोरर् च्या माध्यमातून कोकणात भविष्यात जे वायनरी सुरू करू शकतात अशा सर्व उद्योजकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना संपूर्ण सहकार्य करण्याची व्यवस्था उभारत आहोत. पुढील वर्षभरात कोकणात किमान 25 मायक्रो वायनरी सुरू व्हाव्यात असा प्रयत्न आहे. याकरता कोकण बिझनेस फोरम समन्वयाची भूमिका घेणार आहे.


Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!