पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

आरटीओ अधिकाऱ्यांनी चालविलेल्या कारभारावर नागरिकांमधून नाराजीचा सूर !

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला..?

Tv-1india news                 

पेण /दिपक लोके.     

                   

पेण आरटीओ कार्यालयामध्ये अधिकारी वर्गाची मनमानी कारभार सुरू असून पेण आर.टी. ओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते हे अधिकारी  आल्यापासून पेण आर.टी. ओ मध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाटला आहे. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात आरटीओ अधिकारी वर्गावर नागरिकांचा नाराजीचा कल दिसून येत  आहे.  


                                                       

पेण आरटीओ मध्ये भ्रष्टाचाराने कळस गाटला  असून अधिकारी वर्ग त्याला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे पासिंग करताना मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे समजते इतर आरटीओ मध्ये दोन दिवसांमध्ये पासिंग करण्यात येते. असा कोणता लोड पेन आरटीओ अधिकाऱ्यांवर आहे याची चर्चा नागरिकांमधून होत आहे .  पेण आरटीओ मधील अधिकारी पासिंग करताना जाणून बुजून वाहकांना नापास करतात व नंतर अधिकाऱ्यांनी ठेवलेले दलाल आम्ही तुम्हाला पासिंग करून देतो असे सांगून त्यांच्याकडून हजार ते दोन हजार रुपये उकळतात अशी माहिती पासिंग साठी आलेल्या वाहक यांनी पत्रकारांना दिली.

    पासिंग साठी आलेल्या वाहकावर नापास केल्यामुळे अनेक फेऱ्या आपला स्वतःचा काम धंदा सोडून आरटीओ मध्ये फेऱ्या माराव्या लागतात.त्यासाठी वाहक अधिकारी यांनी नेमलेल्या दलालाला पैसे पुरवून आपली सुटका करून घेतो.   


    
     

तसेच पेण आरटीओ कार्यालयात वाहन प्रणाली जी अपलोड केली जाते त्याची फी घेताना सरकारी फी पेक्षा जास्त आकारणी ग्राहकांकडून केली जाते. त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली तर अधिकारी वर्ग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात कारण यामध्ये सर्वच अधिकारी वर्गाचा हात असल्याचे समजते. तसेच लायसन्स देताना एफ/२ अधिकार संदर्भ देताना अधिकारी वर्ग त्यांना अर्थपूर्ण सहकार्य केल्याशिवाय ती कामे होत नाहीत.तसेच लायसन देताना अशिक्षित वर्गाला व सामान्य नागरिकाला लायसन देताना वेगवेगळे नियम लावून नागरिकांची अशिक्षित वर्गाची लूट करण्यात येते. यामुळे आरटीओ चे अधिकारी भ्रष्ट की अग्रष्ट हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो. आरटीओ कार्यालयात ओरलोड वाहनांसाठी पासेस तयार करण्यात आले असून त्याची वसुली करण्यासाठी अनेक दलाल काम करीत आहेत व त्यामुळेच महामार्गावर मोठमोठे अपघात होत असून त्याला जबाबदार भ्रष्ट झालेले आरटीओ अधिकारीच अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!