केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक

ऑटोरिक्षा चालविणारा आज महाराष्ट्र चालवतोय -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक

महाराष्ट्रात स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे; राज्यातही ताकद वाढवा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे कार्यकर्त्याना आवाहन



Tv1india -मुंबई 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष आम्ही देशाच्या प्रत्येक राज्यात पोहोचवला आहे.देशभर रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढत आहे.मणिपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडणार होते मात्र चुरशीच्या लढतीत रिपाइं चा विजय काही मतांनी चुकला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा राज्यात रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून येतील आणि त्रीपूरा विधानसभेत निश्चित रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडले जाईल असा विश्वास व्यक्त करून राज्यात ही रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. रिपाइं च्या ठाणे शहर जिल्ह्याच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्ष स्थानी रिपाइं चे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे उपस्थित होते. 

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पक्ष मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना सुरुवातीपासूनच रामदास आठवलेंनी कवितांचा धडाका लावला. " मैं ठाणे में नहीं आया किसी से डरने के लिए" मै आया हू 2024 की मॅच जितने के लिये" अशा अनेक कवितांचा धडाका लावत ना.आठवलेंनी भाषणाची सुरुवातच भन्नाट केली.

 या भाषणादरम्यान ना.रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुकही केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही तर मजबूत केली असा टोला रामदास आठवलेंनी लगावला.ऑटोरिक्षा चालवणारा आज महाराष्ट्र चालवतोय असे म्हणत ना.रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. एकनाथ शिंदे यांनी चांगलीच मुसंडी मारली असून ताकद दाखवून दिली असल्याचं आठवले म्हणाले.  

देश फोडणारे फुटतील पण देश कधी फूटणार नाही असे संविधान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिले आहे.संविधान कोणीही कधीही बदलू शकत नाही.संविधान बदलले जाईल या अफवा पसरवल्या जातात.मात्र प्राधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानपूजक आहेत.संविधान मजबूत करण्याची मोदींची भूमिका आहे असे ना.रामदास आठवले यावेळीम्हणाले.

भगवा रंग हा शिवसेना भाजप यांचा जन्म होण्या आधी शेकडो वर्षे आधीपासून बौद्ध धम्माच्या भिक्खुंच्या चिवराचा रंग आहे.त्यामुळे कोणत्याही रंगाला बेशरम म्हणणे योग्य नाही. असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

सत्तेत पोहोचण्यासाठी युती चे राजकारण आता अपरिहार्य झाले आहे.असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले. या मेळाव्यास रिपाइं चे अनेक नेते आणि प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला नेत्या मनीषा करलाद यांना पुत्रशोक झाल्याने त्यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती.

Comments

Popular posts from this blog

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!