Posts

Showing posts from January, 2023

जनरल मजदूर सभा, ठाणे या कामगार संघटनेचे संस्थापक कामगार नेते कै.ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली

Image
जनरल मजदूर सभा, ठाणे या कामगार संघटनेचे संस्थापक कामगार नेते कै.ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली  रोहा :समीर बामुगडे  जनरल मजदूर सभा, ठाणे रोहा येथिल धाटाव औधौगिक क्षैत्रातील कामगारांचे दैवत कै. ॲड.सूर्यकांत वढावकर यांच्या स्मारका समोर एकत्र येऊन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व कामगार प्रतिनिधींनी  दमखाडी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कै.सूर्यकांत वढावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वर्षे भरामध्ये ज्या कामगार, नातेवाईक ज्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . या कार्यक्रमाला जनरल मजदूर सभा, ठाणे संघटनेचे सचिव जगदिश उपाध्यय, संघटनेचे नेते अनंत देशमुख, संघटक सचिव सुहास खरीवले,खेळू वारगे, मंगेश कदम एफ डी सी कंपनीचे अध्यक्ष भाऊ मोरे,सोल्वे कंपनीचे अध्यक्ष तुषार देशमुख ,बेक कमेटीचे अध्यक्ष परशुराम माहबले, कोर्स कमेटीचे अध्यक्ष भगवान करंजे , दिपक नायट्रेड कमेटीचे अध्यक्ष दिलीप सानप,विधीडाय कंपनीचे श्रीकांत जंगम, यानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व आपले विचार मांडले या कार्यक्रमाला चंद्रकांत भगत, अनंत म्हसकर, मनिष साळवी, मंगेश घरटं,

अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अतिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी

Image
अति करणाऱ्या इन्स्पेक्टर अ तिग्रेची मुरुड-जंजिरा मधून उचलबांगडी  कर्तव्यात कसूर केल्याने उचलबांगडी Tv-1india रायगड ब्युरो  मुरुड-जंजिरा मधील संभाव्य हत्याकांड प्रकरणी चुकीचे वर्तन करणाऱ्या इन्स्पेक्टरची अखेर उचलबांगडी करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेतील हा जघन्य प्रकार घडला आहे. या प्रकरणात मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करीत त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल कक्ष येथे नेमणूक केली आहे.राहुल अतिग्रे यांची मुरूड पोलीस ठाण्यातून उचलबांगडी झाल्याने शिवसेना नेत्या सीमा धोत्रे-राऊत, तक्रारदार पुष्पा गांधी यांनी समाधान व्यक्त केले आहे.    सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे हे मुरूड पोलीस ठाणे येथे प्रभारी असताना मुरूड शहरात मे 2022 मध्ये संपत्तीच्या हव्यासापोटी पत्नीने मुस्लिम समाजातील प्रियकराच्या मदतीने औषध देऊन हत्या केली आहे.असा संशय मयत पप्पु जैन यांच्या भगिनी पुष्पा गांधी यांना आल्याने त्यांनी न्यायासाठी खुप प्रयत्न केले. त्यांची कोणतीही सुनवाई मुरूड पोलीस ठ

कोकणात छोट्या वाइनरी मायक्रो वायनरी परवानगी मिळाव्यात

Image
 कोकणात छोट्या वाइनरी मायक्रो वायनरी परवानगी मिळाव्यात व प्रत्यक्ष प्रकल्प उभे राहावेत यासाठी समन्वय. उत्पादन शुल्क खात्याचा सकारात्मक प्रतिसाद  कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून अभियान ! Tv-1india Raigad   महाराष्ट्र राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी मंत्रालयातील बोलावलेल्या मिटिंगच्या पार्श्वभूमीवर कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव व कोलथरचे उद्योजक माधव महाजन यांनी माननीय अप्पर आयुक्त एक्सईज यतीन सावन्त यांची त्यांच्या कार्यालयात जुने जकात घर मुंबई येथे भेट घेतली.  सदर झालेल्या चर्चे मध्ये आलेल्या सर्व मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली . त्या वेळी यतीन सावन्त यांनी छोट्या वायनरी होण्यासाठी सम्पूर्ण सहकार्य करू असे सांगितले . शिवाय फ्रुट वाईनचा प्रसार व्हावा यासाठीही प्रयत्न करू, तुम्ही सेमिनारचे आयोजन करा , असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांना सुचवले .   गेली ५/६ वर्षे  माधव महाजन  यासाठी प्रयत्न करीत होते . माजी आमदार माननीय विजय सावन्त , भाई मोकल ,  विनयजी नातू , माधव भंडारी , कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष  पाशाजी पटेल , नितीन गडकरी,  आमदार प्रसाद लाड , संजय

युवा बिबट्याचा मृत्यू "अनेक प्रश्न निर्माण करणारा"..!

Image
  युवा बिबट्याचा मृत्यू "अनेक प्रश्न निर्माण करणारा"..! मुरुड-रोहा परिसरासह फणसाड अभयारण्यचे "वातावरण संदेहास्पद"..! Tv-1india Special Report किरण बाथम    गेल्या काही वर्षात जनमानसांत उघड झालेले बिबट्याचे प्रकार अनेक आहेत. मुंबई ठाण्याच्या आसपास काही वर्षांपूर्वी सापडलेले बिबटे मुरुडच्या फणसाड अभयारण्यात सोडण्यात आले होते.यामध्ये खारआंबोली परिसरात रस्त्यालगत फास्कीमध्ये बिबटया अडकला होता. त्याला रेस्क्यू करून काही प्राणीमित्र म्हणवणाऱ्यांनी असा नेला होता की अनेकांना त्यावेळी संदेह वाटला होता. त्यानंतर उद्योगपती गुलाम पेशीमाम यांच्या बंगल्याच्या कुंपणीला लागून एक बिबटया फास्कीमध्ये सापडला होता. त्याच परिसरात दहशतवादी आल्याच्या अफवा उठल्या होत्या. बहुतेक ते त्यावेळी अवैध शिकारी असावेत. मुरुड-जंजिरामध्ये नवाबकाळापासून पट्टेरी वाघ, चितळे, हरण, बिबटे, असंख्य प्राणी विद्यमान फणसाड तर नबाबकालीन केसोली जंगलात होते. जंजिराच्या नवाबसाहेबांचे संरक्षित जंगल म्हणजे केसोली जंगल, पूर्वी उन्हाळ्यात नवाबसाहेबांचे वास्तव्य केसोली जंगलात असायचे. त्यांनी अनेक प्राणी जसे शेकरू सारखे विव

पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला...???

Image
आरटीओ अधिकाऱ्यांनी चालविलेल्या कारभारावर नागरिकांमधून नाराजीचा सूर ! पेण आर.टी. ओ नी भ्रष्टाचाराचा कळस गाठला..? Tv-1india  news                  पेण /दिपक लोके.                          पेण आरटीओ कार्यालयामध्ये अधिकारी वर्गाची मनमानी कारभार सुरू असून पेण आर.टी. ओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते हे अधिकारी  आल्यापासून पेण आर.टी. ओ मध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाटला आहे. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात आरटीओ अधिकारी वर्गावर नागरिकांचा नाराजीचा कल दिसून येत  आहे.                                                           पेण आरटीओ मध्ये भ्रष्टाचाराने कळस गाटला  असून अधिकारी वर्ग त्याला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे पासिंग करताना मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे समजते इतर आरटीओ मध्ये दोन दिवसांमध्ये पासिंग करण्यात येते. असा कोणता लोड पेन आरटीओ अधिकाऱ्यांवर आहे याची चर्चा नागरिकांमधून होत आहे .  पेण आरटीओ मधील अधिकारी पासिंग करताना जाणून बुजून वाहकांना नापास करतात व नंतर अधिकाऱ्यांनी ठेवलेले दलाल आम्ही तुम्हाला पासिंग करून देतो असे सांगून त्यांच्याकडून हजार ते दोन हजार रुपये उकळतात अशी म

समाजसेवक विरेंद्र म्हात्रे यांना राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवारत्न पुरस्काराने सन्मानीत

Image
समाजसेवक विरेंद्र म्हात्रे यांना राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवारत्न पुरस्काराने सन्मानीत        रोहा :समीर बामुगडे   १५ जानेवारी रोजी लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वाशी नवी मुंबई येथे समाजसेवक तथा लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरुभाई म्हात्रे यांना "राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवा रत्न" कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                     या पुरस्कार सोहळ्याला माजी न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे,पनवेल वकील सांघटनेचे अध्यक्ष व पनवेल नगर पालिकेचे सभापती ऍड.मनोज भुजबळ,राज्यकार सह आयुक्त डॉ.डेव्हिड अल्वारीस,डॉ शैलेंद्र पवार,संयोजक सलमा खान, संस्थेचे अध्यक्ष नासिर खान,राज्य शिक्षक कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण,उद्योजक कुणाल भोईर, सिने नाट्य पत्रकार महेश्वर टेतांबे,सिने अभिनेत्री मेघना साने,सिद्धी कामत,तारक मेहता का उल्टा चष्मा कलाकार जाकीर खान उपस्थित होते.    समाजसेवक तथा लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरुभाई म्हात्रे यांना लोक कल्याणकारी सेवा रत्न पुरस्काराने सन्

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक

Image
ऑटोरिक्षा चालविणारा आज महाराष्ट्र चालवतोय -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक महाराष्ट्रात स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे; राज्यातही ताकद वाढवा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे कार्यकर्त्याना आवाहन Tv1india -मुंबई   महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष आम्ही देशाच्या प्रत्येक राज्यात पोहोचवला आहे.देशभर रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढत आहे.मणिपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडणार होते मात्र चुरशीच्या लढतीत रिपाइं चा विजय काही मतांनी चुकला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा राज्यात रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून येतील आणि त्रीपूरा विधानसभेत निश्चित रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडले जाईल असा विश्वास व्यक्त करून राज्यात ही रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. रिपाइं च्या ठाणे शहर जिल्ह्याच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्ष