Posts

शेजारधर्म करणाऱ्या इसमाचा खून झाल्याची घटना

Image
बाळसई गावांत चाकू हल्यात एका व्यक्ती चा खून शेजारधर्म आला अंगाशी झाला असंगाशी संग     रोहा समीर  बामुगडे महिलेला होणारी नवऱ्याची सातत्याने मारहाण पाहून शेजारधर्म करणाऱ्या इसमाचा खून झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर घटना अशी कि,गावांत राहण्यारा परशुराम पवार ही व्यक्ती गेली कित्येक महिने व विनाकारण त्यांच्या शेजारी राहत असलेल्या दत्ताराम राऊत यांना विनाकारण त्रास देत होता.तो दारू पिवून घरी येऊन त्याच्या पत्नीला विनाकारण त्रास देऊन शिवीगाळ करत असे.   असंच होळी च्या दिवशी सुद्धा ती व्यक्ती नेहमीचे प्रकार करत दत्ताराम राऊत यांना शिवीगाळ करत आली.त्यांनी घरामध्ये वापरात असेलेली सूरी आणली व दत्ताराम राऊत यांचावर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्यांचं फुफुस व आतडे यावर मोठी गंभीर इजा झाली, त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालय मध्ये हलवले, नंतर पेन येथे उपचारासाठी पाठवले. त्यांची प्रकृती बिघडली व  त्यांचं मृत्यू झाला.     सदर गुन्हाची नोंद नागोठणा पोलीस स्टेशन येथे झाली असून आरोपीवर 302 307 310 गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

महाविकास आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा

Image
  पनवेल महानगरपालिकेच्या जाचक करप्रणाली विरोधात महाविकास आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा Tv-1india  किरण बाथम ब्युरो चीफ  पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या वाढीव जीझिया करप्रणालीचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. पनवेल महानगरपालिकेला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीने हजारोंच्या संख्येने महापालिकेवर आज जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला.     शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व मा आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, ऍड सुरेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, माजी  नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काँग्रेस नेते आर सी घरत, माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, खारघर फोरमच्या अध्यक्

राजमाता जिजाऊ मतिमंद शाळेचे स्नेहसंमेलन

Image
विशेष मुलांच्या शाळेत नृत्यकलेचा आविष्कार राजमाता जिजाऊ  म तिमंद शाळेचे स्नेहसंमेलन Tv-1india  अलिबाग,प्रतिनिधी   जन्म घेणार्‍या प्रत्येकाला निरोगी आयुष्य लाभावे, अस वाटत असते. उंच आकाशात भरारी घ्यावी, फुलपाखरा सारखे बागडावे. पण अनेकांच्या नशिबात है सौख्य नसते. त्यामुळे विविध आजारामुळे जन्मापासून अपंगत्व आलेल्या विशेष अपत्यांना सांभाळताना पालकांची विशेष करून जन्मदात्रीला तारेवरची कसरत करावी लागते. अशा विशेष मुलांसाठी अलिबाग येथील कुरुळ आरसीएफ कॉलनीत पाठबळ सामाजिक संस्थेच्यावतीने गेल्या दहा वर्ष पासून मतिमंद शाळा चालविली जात आहे. या विशेष शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यामध्ये शाळेतील मुलांनी आकर्षक चित्रे रेखाटून,विविध मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेत तसेच बहारदार नृत्ये सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या कार्यक्रम प्रसंगी आरसीएफचे कार्यकारी संचालक ए. एम. खाडिलकर, भालचंद्र देशपांडे, संतोष वझे आवर्जून उपस्थित होते. यावेळी खाडिलकर यांनी आपल्या भाषणातून शाळेचे,शिक्षकांचे तसेच पालकांचे विशेष कौतुक केले.अशा विशेष मुलांना सांभाळणे सोपे काम नाही. अशा विशेष मुलांना जीव

अभ्युदय बँक जेएनपीटी तर्फे महिलांचा सत्कार

Image
अभ्युदय बँक जेएनपीटी तर्फे  महिलांचा सत्कार Tv-1india प्रतिनिधी :समीर बामुगडे   ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र  उत्साहात साजरा करण्यात येतो. या महिला दिनाच्या औचित साधता अभ्युदय बँक च्या वतीने सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी उपस्थित सर्व महिलांना पुष्प गुच्छ व मिठाई  देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.              या प्रसंगी अभ्युदय बँकेचे व्यवस्थापक आर.एस.पारते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिला समाजात कुठेच कमी नाहीत. महिला आपल्या हिमतीवर जग जिंकू शकतात. आज महिलांनी समाजात वेगळ स्थान निर्माण केले आहे. आज त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात परिपूर्ण आहेत.    एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकत मात्र एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शिकतो. त्यामुळे महिलांना समाजात एक विशेष स्थान देणे गरजेचे आहे. त्यामुळे स्त्रियांचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे.   तसेच या वेळी  त्यांनी सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  या वेळी राजश्री  पाटील, विनीता म्हात्रे, सुप्रिया म्हात्रे, प्रेमलता ठाकूर, प्रियांका नाईक,

रमेश धनावडे यांचे 'कवितेच्या सुरातून' हे पुस्तक संदर्भग्रंथ ठरेल -कवी ए.के. शेख

Image
रमेश धनावडे यांचे 'कवितेच्या  सुरातून' हे पुस्तक संदर्भग्रंथ ठरेल - कवी ए.के. शेख Tv-1india  अलिबाग एका कवीबद्दल दुसरा कवी चांगले बोलत नाही. मात्र कवी रमेश धनावडे यांनी कवितेच्या सुरातून या पुस्तकाद्वारे ६३ कवींची त्यांच्या काव्याच्या रसास्वादासह माहिती देऊन मौलिक कार्य केले आहे,  त्यांचे हे पुस्तक संदर्भग्रंथ ठरेल,  असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, गझलकार ए.के. शेख यांनी केले.       रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणेचे  उपमहाव्यवस्थापक - एच.आर.(कॉर्पोरेट अफेअर्स), साहित्यिक, कवी रमेश प्रभाकर धनावडे यांच्या  'कवितेच्या  सुरातून' या पुस्तकाचे प्रकाशन  आदर्श पतसंस्था सभागृह येथे कवी, गझलकार ए.के. शेख, माजी आमदार पंडित पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर,  विशेष सरकारी वकील अँड. प्रदीप घरत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, कामगार नेते दीपक रानवडे,  कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरुड-जंजिरा शाखाध्यक्ष संजय गुंजाळ, रायगड जिल्हा सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद

रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...!

Image
रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड...! पुन्हा सुरू झाली लाकडाची अवैध कत्तल Tv-1india  रोहा :प्रतिनिधी   वनविभाग खात्याच्या अजब कारभारामुळे सामान्य शेतकरी हैराण झाले आहेत.वनविभागाचे कर्मचारी लाकूड व्यापा-यांना हाताशी धरुन अवैध वृधतोड करत आहेत. त्यामुळे वनविभाग जाणीवपूर्वक या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून आता रोहा तालुक्यात सानेगाव जंगलपट्टयात होतेय अवैध वृक्ष तोड पुन्हा सुरू झाली आहे.    वृक्षतोड होत असणा-या सानेगाव परिसरातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सरकार आणि नोकरशाही त्याच्या निष्क्रीय आणि ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेला रोज नव्या समस्याना सामोरे जावे लागत आहे.समस्या सोडवून घेण्यासाठी म्हणून शासन दरबारी जायचे आणि दरबारातून परतायचे असा अनुभव नागरिकाना आला आहे.   सानेगाव जंगलपट्टयात  मोठया प्रमाणात   वृक्षतोड सुरू आहे. ऐन ,किंजळ,साग ,आणि इतर जातीची झाडे आहेत. या झाडांचा विट भट्टीसाठी  लाकडाचा वापर  केला जातो. त्यासाठी मोठी मागणी असते, परिणामी लाकडाला  मोठी किमत मिळते. तसेच  या कामी व्यापारी आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यात सा

नेपाळी मालकाने विजयला केले ठार

Image
  साई एकविरा चायनीज सेंटरवर झालेल्या मारामारीत नेपाळी मालकाने विजयला केले ठार  Tv-1india  पेण  दिपक लोके मयत:-विजय पवार  वडखळ पोलीस ठाणे हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्यांत वाढ होत आहे.आज सर्वत्र होळीच्या सणाची धामधूम सुरु असताना येथील साई एकविरा चायनिज सेंटरवर नेपाळी मालका सोबत झालेल्या मारामारीत, चायनिज वरील काम करणाऱ्या विजय हरीचंद्र पवार वय २४ वर्ष राहणार वावे (नवेगाव) आदिवासी वाडी वडखळ याला जिवेठार मारण्याची संतापजनक घटना घडली.   यातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी विजयाची पत्नी तसेच कुटुंब व ग्रामसथांकडून करण्यात येत आहे    या घटनेचा तपास डी वाय एस पी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक तानाजी नारनवार हे करत आहेत या घटने नंतर मृत विजय च्या नातेवाईक व आदिवासी समज बांधवांनी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.   आरोपीला अटक करण्यात येऊन, गुन्ह्याची नोंद करण्यात येत असल्याची माहिती डी वाय एस पी संजय शुक्ला व पोलीस निरिक्षक तानाजी नारनवार यांनी दिली आहे.